दोघांना लोखंडी रॉडने मारहाण
Updated On:

नगर – भिंगारच्या लक्ष्मीनगर परिसरात दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रमेश शांताराम पवळ (रा. जामखेड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राज पवळ (रा. लक्ष्मीनगर, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांचा चुलत भाऊ सनी पवळ ते घरासमोर उभे असताना रमेश पवळ तेथे आला. तुम्ही मला घराबाहेर का काढले असे म्हणून त्याने शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नकोस असे म्हटल्याच्या रागातून त्याने लोखंडीरॉड सनीच्या डोक्यात मारून दुखापती केली. याबाबत भिंगार कॅंम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धामणे करीत आहेत.





