लग्न परंपरा.. रूढी आणि खेळखंडोबा ! Made in Heaven 2 चा ट्रेलर एकदा पहाच VIDEO

मुंबई – भारतीय लग्नांतील रीती,परंपरा या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असल्याचे पाहायला मिळते. हाच धागा पकडत भारतीय लग्नसमारंभांमधील परंपरा, आधुनिक महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक रुढी यांच्यातील विरोधाभास दाखवायला ‘मेड इन हेवन’चा दुसरा सीजन रेडी झाला आहे. नुकतंच याचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलवरून यामधून काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सीझन 1 च्या शेवटी, या सीरीजमधील प्रमुख पात्रे एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली होती. तिथूनच ‘मेड इन हेवन’चा दुसरा सीझन सुरू होतो. नवीन वधु आणि नव्या आव्हानांसह आपले आवडते वेडिंग प्लॅनरर्स त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांना सामोरे जातात. लग्नसमारंभ आयोजित करण्याच्या आणि साजरे करण्याच्या किचकट प्रक्रियेतून या व्यक्तिरेखा जात असतात तर दुसरीकडे त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडत असतात.
प्राइम व्हिडियो या भारतातील सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट डेस्टिनेशनतर्फे ‘मेड इन हेवन’ या ॲमेझॉन ओरिजिनल सीरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.या इंटरनॅशनल सीरिजला बहुचर्चित ऍमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेले आहे. यामध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथुर, जिम सर्भ, कल्की कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी आणि विजय राज या कलाकारांसोबतच मोना सिंग, इश्वाक सिंग आणि त्रिनेत्रा हलदर हे चेहरेही पाहायला मिळणार आहेत.
या सीरीजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान, नित्या मेहरा, रीमा कागटी आणि झोया अख्तर यांनी केले आहे. भारत आणि जगभरातील 240 देश व प्रातांमध्ये या 7 एपिसोड्सच्या सीरिजचा एक्सक्लुझिव्ह प्रीमिअर होणार आहे.‘मेड इन हेवन’ सीझन 2 मध्ये ताराच्या भूमिकेत परतल्याचा मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ताराचा प्रवास हा विलक्षण आणि आव्हानात्मक आहे. कारण आदिल आणि फैझासोबत आपले वैयक्तिक आयुष्य जगत असतानाच दुसरीकडे भव्य लग्नसमारंभांचे नियोजनही करत असते.”, अशा भावना शोभिता धुलिपालाने व्यक्त केल्या.





