या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. ‘अॅाल अबाऊट हर’ या पॉडकास्टमध्ये बोलताना एका वेदनादायक ब्रेकअपनंतर तिला अनेक महिने निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागल्याचा खुलासा तिने केला. Kalki Koechlin

Kalki Koechlin : झोप उडाली, मन अस्थिर झालं; त्या घटनेनंतर कल्कीला मानसिक त्रासाला सामोर जावं लागलं; सांगितला वेदनादायी काळ
कल्कीने सांगितले की, त्या काळात तिला झोप लागत नव्हती आणि रात्री 2-3 वाजता जाग येत असे. त्यानंतर पुन्हा झोप येत नसल्याने ती गिटार वाजवत किंवा स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून ठेवत असे. या अनुभवातून तिला मानसिक स्थितीचा शरीरावर किती खोल परिणाम होतो, याची जाणीव झाली. Kalki Koechlin
या परिस्थितीचा तिच्या कामावरही परिणाम झाला असल्याचे तिने बोलताना सांगितले. कामाच्या वेळी आपण स्वप्नात आहोत की प्रत्यक्षात, याचा गोंधळ होत असल्याचे तिने सांगितले. हा त्रास जवळपास चार महिने सुरू होता, असा धक्कादायक खुलासही तिने केला.
कल्कीने नेमक्या कोणत्या नात्याबद्दल ती बोलत आहे, हे स्पष्ट केले नसले तरी तिचे नाव दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत जोडले गेले होते. देव डी या चित्रपटात तिने सहाय्यक कलाकाराचे काम केले होते. हा तिचा बॅालिवूडमध्ये पदार्पणाच पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटादरम्यान तिची अनुराग कश्यपशी ओळख झाली. 2011 मध्ये त्यांनी विवाह केला, मात्र 2013 मध्ये ते वेगळे झाले आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
‘देव डी’ या पहिल्याच चित्रपटासाठी कल्किला फिल्मफेरचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ती स्वतंत्र चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिने ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांतून ओळख मिळवली आहे.
हेही वाचा : Rahuri by-election : शरद पवार गटाचा बडा नेता मोठा निर्णय घेणार? मुख्यमंत्र्यांच्या सभेत मोठी घडामोड घडण्याची शक्यता