‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Kalki 2898 AD Trailer| अभिनेता प्रभासच्या कल्की 2898 एडी या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कल्की 2898 एडीच्या ट्रेलर रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी हा ट्रेलर 7 जून रोजी रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाच्या ट्रेलरबाबतची आणखी एक अपडेट समोर आली आहे.
हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटावर जवळपास 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन बातम्या येत होत्या. प्रत्येक बातमीसोबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
View this post on Instagram
निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर जारी करून ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. रिलीज झालेल्या नवीन पोस्टरनुसार, चित्रपटाचा ट्रेलर 10 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे.
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, ब्रह्मानंदम, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली सी अश्विनी दत्त या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे. हा चित्रपट यावर्षी 27 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.





