“रेसिडेन्शिअल’ची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

नगर – बारावीच्या परीक्षेत याही वर्षी “जिल्हा मराठा’च्या रेसिडेन्शिअल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा राखली. विज्ञान शाखेचा 99.71. टक्के, वाणिज्य शाखेचा 100 टक्के, तर कला शाखेचा निकाल 85.03. टक्के लागला असल्याचे प्राचार्य अशोक दोडके यांनी सांगितले.
विद्यालयातील विज्ञान शाखेमध्ये सुरज राजेंद्र जायभाय हा विद्यार्थी 93.23 टक्के गुण मिळवून प्रथम आला. विज्ञान शाखेतील 28 विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणारे 23 विद्यार्थी, 99 गुण मिळविणारे 25 विद्यार्थी व 98 गुण मिळविणारे 24 विद्यार्थी आहेत.
विज्ञान शाखेतून 356 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 182 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेमधील इंग्रजी माध्यमात रिथ्दी विनायक आडेप हिने 93.06 टक्के गुण मिळविले.
वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमात सिमरन फारुक सय्यद हिने 86.46 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. बुक किपिंग ऍण्ड अकौटन्सी विषयात तीन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले. इंग्रजी माध्यमात प्रविष्ठ असलेल्या 93 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थ्यांना 90 टक्यांपेक्षा अधिक गुण आहेत. वाणिज्य शाखेतील 92 विद्यार्थी विशेष श्रेणीत उर्त्तीर्ण झाले.
इंग्रजी माध्यमात तव्वल 10 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. कला शाखेतून गौरी शिवाजी कानवडे हीने प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने राबविलेला स्पेशल बॅचचा उपक्रम, दर्जेदार शिक्षण, अभ्यासेतर प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांनी याही वर्षी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता राखल्याचे प्राचार्य अशोक दोडके यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष, रामचंद्र दरे, सेक्रेटरी जी. डी. खानदेशे, सह-सेक्रेटरी विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर व विश्वस्तांनी अभिनंदन केले आहे. प्राचार्य अशोक दोडके, उपप्राचार्य एल. एच. देशमुख व पर्यवेक्षक दिलीप मगर यांच्यासह शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.





