मुंबईतील ब्रिजवर बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गाडी जळून खाक

मुंबई – माटुंगा येथील ब्रिजवर आज सकाळी भीषण अपघत झाला. चाललेल्या कारने अचानक पेट घेतल्याने ब्रिजवर खळबळ उडाली. सुमारे अर्थ ते पाऊण तास ही कार रस्त्यावर जळत होती. चालकाने कसेबसे कारमधून बाहेर पडत आपला जीव वाचवला.
कारला लागलेल्या अचानक आगीमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली होती. कारला आग लागताच आगीचे प्रचंड लोळ उठू लागले होते. सकाळी सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा झाला.

गर्दी वाढू लागल्याने ट्राफिक जॅम व्हायला सुरुवात झाली होती. अग्निशमन दलाला या अपघाताबाबत खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. ब्रिजवर वाहनांच्या रांगा लागल्या आणि बघ्यांची देखील मोठी गर्दी जमा झाली होती.
या आगीमुळे इतर वाहनांना आणि नागरिकांना इजा होऊ नये यासाठी मुंबई पोलीस, वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात आलं.यामध्ये आग लागलेली कार प्रथम रस्त्यातून बाजूला करून इतर वाहनांना जाण्यासाठी मार्ग देण्यात आला.

कारला आग लागण्याचं नेमकं कारण काय होत हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेचं नेमकं कारण काय होत आणि ही गाडी कोणाच्या नावावर आहे याचा तपस पोळी अद्याप करत आहेत.





