satara | दहिवडीत यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार

दहिवडी, (प्रतिनिधी)- माण तालुक्यातील दहिवडी येथे श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार लोकांनी अमुभवला. बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या गाडी मालकास दुचाकी व मानाची ढाल बक्षीस प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच अंतिम फेरीमधील गाडी मालकांना हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात आली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया जयश पाटील व जोकर फॅन्स क्लब यांनी मिळवला. दुसरा क्रमांक जय मल्हार (कटगुण) तर तिसरा भैरवनाथ प्रसन्न (बिदाल) यांनी मिळवला. चौथा क्रमांक जोतिबा प्रसन्न गनुबुवा एक्स्प्रेस (कुकुडवाड )तर पाचवा क्रमांक वैभव जाधव (दहिवडी) व अरविंद हुबाले यांच्या बैलांनी पटकावला. उत्तेजनार्थचे बक्षीस जोन्ट्या फॅन क्लब (दहिवडी) व खंड्या लक्ष्या (खटाव) यांना देण्यात आले.
दहिवडीच्या बाजार पटांगणावर बक्षीस वितरण करण्यात आले. नगरसेवक महेशराव जाधव यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी विजय जाधव, राजू मुळीक, हर्षद जाधव, किशोर साळुंखे, वैभव जाधव, राहुल गोरे, संतोष जाधव, अथर्व जाधव, सूरज कदम, अनिल जाधव, अमृत जाधव, शंकर मुळीक, संदीप मुळीक, राजू जाधव, पैलवान वलेकर, मकरंद जाधव, मोहन गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. या जंगी मैदानासाठी मुळीक परिवाराने जागा उपलब्ध करून दिली.





