काबुल – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात तिघेजण विमानातून पडल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. काबुल विमानतळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी चक्क विमानतळाच्या धावपट्टीवरच गर्दी केली होती. विमान धावपट्टीवरून धावायला लागले तेंव्हा ही गर्दी विमानाच्या बरोबरच धावायला लागली होती. यापैकी काहीजणांनी जीवाची भीती न बाळगता विमानाच्या टायरला आणि लॅन्डिंग गीअरला लोंबकळायला सुरूवात केली. मात्र तशाही परिस्थितीत विमानाने टेक ऑफ केले.
विमान हवेत उडाल्यावर यापकी तिघेजण खाली पडले. काही घरांच्या छपरांवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या पडणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या भीतीदायक होत्या, असे विमानतळाजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले.