दोघात तिसरा येणार.! रुबीना दिलीक आई होणार, पोस्ट शेअर करत म्हणाली….

मुंबई – प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक (rubina dilaik) आई होणार आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीचा (pregnancy) खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना गरोदरपणाची (pregnancy) गोड बातमी दिली आहे.
यावेळी अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सगळीकडे चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांनी तिला प्रेग्नेंसीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
रुबिना दिलीकने (rubina dilaik) इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पती अभिनवसोबत दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा पोशाख आणि वर पांढरा स्वेटर परिधान केला आहे. तिचा बेबी बंप दाखवताना अभिनेत्रीने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,
View this post on Instagram
“जेव्हापासून आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही वचन दिले होते की आम्ही एकत्र जग फिरू. मग आम्ही लग्न केले आणि आता एक कुटुंब म्हणून आम्ही लवकरच आमच्या लहान पाहुण्यांचे स्वागत करू…!’ असं अभिनेत्री म्हणाली.
अभिनेत्री रुबिना दिलीक छोटी बहू, शक्ती अशा गाजलेल्या मालिकांमधून लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस-14’ची विजेती रुबीना ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती चाहत्यांशी आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
छोट्या पडद्यावर आदर्श सून अशी प्रतिमा असलेल्या रुबिना आपल्या खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि मादक आहे. त्यामुळेच तिचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.





