Bachchu Kadu : “ठाकरे गटावर ही परिस्थिती…”; बच्चू कडूंनी थेट नाव घेत साधला निशाणा
Bachchu Kadu : बच्चू कडूंचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

Bachchu Kadu : उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर आता आमदारही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याचदरम्यान आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिल्यानंतर आता आणखी काही जण शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा, आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. सचिन अहिर आले, आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार आहे,’ असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. Bachchu Kadu
ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु ही चर्चा सुनील शिंदे यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही सुनील शिंदे हे फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
पावसाचा जोर वाढल्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’चाही जोर वाढणार
बच्चू कडू म्हणाले, “ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्यावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, “सुनिल शिंदे यांनी आता नकार दिला आहे, पण नाही म्हणणारे पहिले येतात. आता आणखी काही आमदारांच्या क्रिकेटची टीम शिवसेनेत येईल. पावसाचा जोर वाढल्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’चाही जोर वाढेल. शिवसेनेत सचिन अहिर आले आहेत. आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार आहे.” Bachchu Kadu
तर संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत बच्चू कडू म्हणाले, “आता संजय राऊतही रोखू शकत नाही. सर्व खापर हे संजय राऊत यांच्यावर फुटत आहे. या प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना खूप झापलं. आता फक्त मारायचं राहिलं. आता ठाकरेंच्या शिवसेनेवर संजय राऊतांमुळे परिस्थिती आली आहे. त्यामुळे ते काही पण बोलू लागले आहेत’.
दरम्यान, शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर काल ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाली. यापाठोपाठ आता शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेला (शिंदे गट) पाठिंबा जाहीर केला आहे.
या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिंदे गटाची ताकदही वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात अनेकजण शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Bachchu Kadu
हेही वाचा:







