Pune temperature | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील बहुंताशी जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. आज मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान हे अकोला जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहे. ४३.३ अंश सेल्सिएस इतकी तापमानाची नोंद आज या जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील तापमानाने ४३ अंश सेल्सिएसचा पार गाठला आहे. यामुळे अकोल्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात उष्णतेची झळ बसू लागली आहे. पुण्यातही तापमानात काही अंशी वाढ झाली असून तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. यामुळे पुणेकरांच्या जीवाची काहिली होती. पुणे शहरातील आजचे तापमान ४१.२ अंश सेल्सिएस नोंदविण्यात आले आहे. अमरावती बीड यवतमाळ सोलापूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ४२ अंशहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट तापमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात उष्णतेची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे.