सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर खास दिवशी होणार प्रदर्शित

Salman Khan | बॉलीवूडचा ‘दंबग’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यातच त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचा टीझर आता लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
येत्या २७ डिसेंबरला ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी टीझर रिलीज करत त्याच्या चाहत्यांना सरप्राइज दिले जाणार आहे. २७ डिसेंबर रोजी सलमान खान ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसंच सिनेमाचं पोस्टरही त्याच दिवशी आऊट केलं जाईल. सिनेमात सलमानचा कधीही न पाहिलेला अवतार बघायला मिळणार आहे.
सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करत आहेत. यावेळी त्याच्यासोबत दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शकच नाही तर पुष्पाची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सलमानचे चाहते सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
2014 मध्ये आलेल्या ‘किक’ या चित्रपटानंतर सलमान खान आणि साजिद नाडियादवाला पुन्हा एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. अलीकडेच सलमान खान रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसला. या चित्रपटात सलमान खानने चुलबुल पांडे या त्याच्या पात्राची पुनरावृत्ती केली.
याशिवाय 25 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या वरुण धवनच्या बेबी जॉनमध्येही तो ॲक्शन-पॅक्ड कॅमिओ करणार आहे. वरुणचा हा चित्रपट सलमान खानच्या कॅमिओमुळेही चर्चेत आहे. ट्रेलरमधील सलमानच्या एका झलकने या चित्रपटाची देखील उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा:
भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना न्यायालयाने बजावली नोटीस ; सत्येंद्र जैन यांनी केला ‘हा’ आरोप





