गुरुजींच्या हाणामारीने कोल्हापूरकर आवाक

कोल्हापूर- कोल्हापुरात भर सभेत शिक्षकच एकमेकांना धक्काबुक्की करत भिडल्याचा प्रकार समोर आला आहे। कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घटना घडली आहे. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील शाहू सांस्कृतिक सभागृह इथं आज या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलं होतं

सभा सुरू होताना प्रास्ताविक आणि अहवाल वाचन करण्यात आलं. यानंतर प्रश्न विचारण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीने सभासदांना मुभा देण्यात आली. यावेळी हा सगळा गोंधळ उडाला एवढेच नव्हे तर प्रश्न विचारण्यासाठी स्टेजवर आलेल्या शिक्षकांच्या अंगावर धावून जाऊन गेल्याचा प्रकाराने या गोधळाला सुरुवात झाली.

स्टेज वरील शिक्षकाला विरोध करणाऱ्या खालील शिक्षकाला इतर शिक्षकांच्या रोषाला समोर जावं लागलं. एकमेकांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर धक्काबुक्की झालं यावेळी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या मुळे भर सभेत एकच गोंधळ निर्माण झाला.

शिक्षकांनी केलेल्या धक्काबुक्की आणि शिवीगाळ प्रकरणात सभास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी दाखल झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.