Mirzapur: The Movie : आता मिर्जापूर मोठ्या पडद्यावर! पोस्टर अन् रिलीज डेट समोर
Mirzapur: The Movie : या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Mirzapur: The Movie : हिंदी वेबसिरीजच्या विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मिर्जापूर या वेबसिरीजला आता मिर्जापूर द मुव्ही चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद चाहत्यांना घेता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मिर्जापूर ही वेबसिरीज चित्रपट फॅार्ममध्ये येणार असल्याची चर्चा होती. यामुळे चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे त्यांचे लक्ष होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, २०२६ या वर्षातच मिर्जापूर द मुव्ही चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हा चित्रपट मिर्झापूर विश्वातील एक अनोखी कहाणी दाखवणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंट बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे, तर कासिम जगमागिया आणि विशाल रामचंदानी सह-निर्माते आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे.
४ सप्टेंबर २००६ या दिवशी मिर्जापूर द मुव्ही चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये आता ‘भौकाल’ मोठ्या पडद्यावर पहा! ४ सप्टेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये ‘मिर्झापूर’ चित्रपट पहा.” असे म्हटले आहे.
मिर्जापूर वेबसिरीजमध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडित, मुन्ना भैया या तीन पात्रांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. इतरही पात्रांचे कौतुक प्रेक्षकांनी केले आहे. आता मोठ्या पडद्यावर ही सगळी पात्रं मिर्जापूर द मुव्ही चित्रपटाद्वारे बघायला मिळणार आहेत. ज्यामुळे चाहत्यांना एक रोमांचक अनुभव मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
या चित्रपटात जितेंद्र कुमार, रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, हर्षिता गौर, सुशांत सिंग, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, कुलभूषण खरबंदा आणि सोनल चौहान या कलाकरांचा समावेश आहे.
हेही वाचा : Gold-Silver Price Crash: पुन्हा एकदा घसरण ! चांदी अचानक ₹२४,००० ने घसरली तर सोन्यात ‘एवढ्या’ रुपयांनी घट





