सूर्य आग ओकणार ! राज्यात उष्णतेचा पारा वाढणार

मुंबई – राज्याच्या काही भागात पावसाचा जोर असून काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात 25 ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. विशेषतः शनिवारी पश्िचम महाराष्ट्रासह नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावसह 16 जिल्ह्यात, तर रविवारी संपूर्ण राज्यात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर पुन्हा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता जाणवते. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने कले आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे.





