कथा अजून संपलेली नाही.! ‘द केरळ स्टोरी 2’ बद्दल निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, वाचा काय म्हणाले….

मुंबई – सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईचा आकडा पार केला असून, जवळपास 225 कोटी रुपयांच्या घरात हा चित्रपट पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
आणि म्हणूनच आतापर्यंत ‘द केरळ स्टोरी’ने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत आणि बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवले आहे. अनेक राज्यांमध्ये बंदी आणि चित्रपटाच्या विरोधात निषेध असूनही, ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.
या चित्रपटाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रया दिल्या आहेत. दरम्यान, अश्यातच आता ‘द केरळ स्टोरी’च्या बाबतीत एक नवी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी एका मुलाखतीत ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्याची मोठी हिंट दिली आहे.
विपुल शाह म्हणाले आहेत, “या सिनेमाची कथा अजून संपलेली नाही..अजून बरंच काही सांगायचं आहे. यावेळी आम्ही ते नक्कीच समोर आणायचा प्रयत्न करू. तुम्ही काळजी करू नका”. असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या भागात आणखी काय दाखवले जाणार हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांच्या भूमिका आहेत.





