राज्याची वाटचाल पूर्ण अनलॉकच्या दिशेने; दिवसभरात 10,219 नवीन रुग्ण

मुंबई – राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असून करोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसत आहे. राज्यात आज 10,219 रुग्ण आढळून आल्याने राज्यातील करोना संक्रमणाचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात आज 10,219 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 154 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूदर हा 1.72 टक्के एवढा झाला. राज्यात आज 10,219 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 1,74,320 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58,42,000 झाली आहे.
राज्यात आज 21,081 रुग्ण बरे होऊन घरी गेले असू आजमितीस एकूण 55,64,348 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.25 % एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,66,96,139 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,42,000 (15.92 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12,47,033 व्यक्ती होम क्वारंटाईन, तर 6,232 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.





