सपकळवाडीचा आदर्श राज्याने घ्यावा: आमदार भरणे
Updated On:

भवानीनगर : सपकळवाडी (ता. इंदापूर) येथे ग्रामस्थांच्या वतीने कोविड सेंटर उभे करून गावातील नागरिकांची गावातच सोय करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असेल. यामुळे सपकळवाडी या गावाचा आदर्श राज्यातील इतर गावांनीही घ्यावा असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
भरणे म्हणाले की, आपापल्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या वतीने गावांमध्येच कोवीड सेंटर विलगीकरण सुरू केले तर नक्कीच याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरपंच सचिन सपकळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे त्यांनी आभारही मानले.
कोविड सेंटरमध्ये 10 बेडची विलगीकरण करण्याची
सोय करण्यात आली असून योग्य पद्धतीने सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करोना बाधितांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे.
टॅग्स:





