राज्यात रविवारी 1,437 करोना रुग्णांची नोंद
Updated On:

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून करोना संसर्ग आटोक्यात असून बाधितांच्या संख्येत मोठी घट दिसून येत आहे. राज्यात रविवारी 1,437 नवे रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी 1,635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात एक हजार 437 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन हजार 375 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच दिवसभरात सहा रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात 2 लाख 4 हजार 942 व्यक्ती होम क्वॉरंटाईन, तर 1068 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 16 हजार 422 इतकी आहे.





