Sandeep Karnik : चोर शिरल्याचा बनाव अन्…; विकृत अशोक खरातच्या अशा आवळल्या मुसक्या, पोलीस आयुक्तांनी सांगितला अटकेचा थरार
Sandeep Karnik : अशोक खरातला पोलिसांनी कशी अटक केली? प्रकरणातील व्हिडिओ कसे व्हायरल झाले? याविषयी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुलाखतीत महत्वाची माहिती दिली आहे.

Sandeep Karnik : राज्यभरात नाशिकच्या भोंदू आणि विकृत अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 17 मार्च 2026 रोजी अशोक खरातला त्याच्या घरातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून आत्तापर्यंत हादरुन टाकणारी माहिती सातत्याने समोर येत आहे.
या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. मात्र, अशोक खरातला पोलिसांनी कशी अटक केली? प्रकरणातील व्हिडिओ कसे व्हायरल झाले? यावर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik ) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. नुकतीच त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.
मुलाखतीत संदीप कर्णिक (Sandeep Karnik ) यांनी अशोक खरातच्या अटकेचा संपूर्ण थरार सांगितला. तब्बल दोन तास चाललेल्या अटकेचे अॅापरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने राबविण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तक्रारदार फिर्यादीची तक्रार नोंदवून घेत खरातला अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
चोर शिरल्याचा बनाव अन्… Sandeep Karnik
अशोक खरातवर तक्रारदार महिलेने गंभीर आरोप करत तक्रार नोंदवली. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी ज्या ठिकाणी अशोक खरात राहत आहे. त्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव करत त्याच्या घरात शिरले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच या प्रकरणात एक मोठा खुलासा त्यांनी केला. या अॅापरेशनची केवळ तिघांना माहिती होती, असे त्यांनी सांगितले.
व्हिडिओ कसे व्हायरल झाले? Sandeep Karnik
अशोक खरात हा त्याच्या अॅाफिसमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करायचा. यासाठी नराधम विविध कृप्त्या वापरून महिलांना घुलवायचा. त्याच्या अॅाफिसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ते नेमके कसे व्हायरल झाले. यावर संदीप कर्णिक म्हणाले, पोलिसांकडे असलेल्या व्हिडिओतील एकही व्हिडीओ बाहेर आलेला नाही. मात्र, अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयने हे व्हिडीओ काढले होते. त्याच्या माध्यमातून हे व्हिडीओ व्हायरल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
खरातने त्याच्या ऑफिस बॉयच्या 7 महिने गर्भवती असलेल्या पत्नीचा विनयभंग केल्यामुळे ऑफिस बॉय खरातच्या विरोधात गेला आणि त्याने काही व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्याने हे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. खरात दबाव आणत होता. त्याला आणि त्याच्या पत्नी, मुलांना मारण्याची धमकी खरातने दिली होती. त्यामुळे जीवाच्या भीतीने ऑफिस बॉयने आपल्या विश्वासू लोकांकडे हे व्हिडिओ ठेवले होते.
शिवाय त्याने त्यांना, ‘जर माझ्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर तुम्ही हे व्हिडीओ बाहेर काढा. जेणेकरून हे प्रकरण दबलं जाणार नाही.’ असे सांगितले होते. दरम्यान, खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या 65 खात्यांवर गुन्हा दाखल केले आहेत, अशी माहिती संदीप कर्णिक यांनी दिली.





