Rupali Chakankar : ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला’; शरद पवार गटाच्या महिला नेत्याची चाकणकरांवर टीका
Rupali Chakankar : खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar ) यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागले आहे. यानंतर रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला.
रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. अशोक खरात प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात रूपाली चाकणकर यांच्या टीका केली जात आहे. विरोधकांकडूनही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता.
अखेर त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे ट्वीट
‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला,’ असे रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांना सुनावले आहे. तर अंजली दमानिया यांनी देखील ‘कर्माचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात भोगावं लागतं,’ असा निशाणा चाकणकरांवर साधला आहे.
‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला… #Maharashtra #Politics
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 28, 2026
रुपाली चाकणकरांनी ट्वीटमध्ये काय म्हटले आहे?
राजीनामा दिल्याचे पत्र रुपाली चाकणकरांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहे. यासोबत त्यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.
तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. Rupali Chakankar
हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. Rupali Chakankar
हेही वाचा:






