करोनाचा विळखा वाढतोय.! राज्यात दिवसभरात 692 नव्या रुग्णांची नोंद
Updated On:

नवी दिल्ली – देशात काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात गेल्या 24 तासांत 692 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 97 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
2020 मध्ये जगभरात करोनाचा उद्रेक झाला होता. आता करोनाचा उपप्रकार जेएन.1 चा पहिला रुग्ण दिल्लीत आढळून आला असून दोन ओमिक्रॉन रुग्ण आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली.
करोनाच्या जेएन.1 उपप्रकाराची पहिली केस केरळमध्ये नोंदवली गेली. आतापर्यंत देशात करोनाच्या जेएन.1 उपप्रकारची एकूण 109 प्रकरणे आढळून आली आहेत. सध्याच्या परिस्थितीवरुन जेएन.1 द्वारे धोका कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.





