Smriti Mandhana | आयसीसीकडून फलंदाज ‘स्मृती मानधना’चा खास गौरव

मुंबई – भारताच्या महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिचा आयसीसीने खास गौरव केला आहे. शंभर टक्के क्रिकेट सुपरस्टार खेळाडूंच्या यादीत तिचा समावेश करण्यात आला आहे.
मानधना सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. ही क्रिकेट स्पर्धा चालू असतानाच मानधनाला आनंदाची बातमी देतानाच आयसीसीने तिचे नाव या यादीत समाविष्ट केले आहे. शफाली वर्मा, इंग्लंडची सोफी एक्केलस्टोन, न्यूझीलंडची अमेलिया केर, वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज व दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड या 100 टक्के क्रिकेट सुपरस्टारच्या महिला खेळाडूंचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
स्मृतीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 74 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये तिने 5 शतकांच्या मदतीने आणि 42.52च्या सरासरीने 2,892 धावा केल्या आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये तीने आतापर्यंत 92 सामने खेळले असून यामध्ये 2,192 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त स्मृतीने 4 कसोटी सामने देखील खेळले असून एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने मोलाचे योगदान दिले.






