महायुतीत वादाची ठिणगी ? रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रुपाली चाकणकरांनी भरत गोगावलेंना सुनावले..

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशासाठी आतूर असलेले महाडचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री सोपविण्यात येण्याच्या शक्यतेबाबत बोलताना गोगावले यांनी ‘महिला आणि पुरुषांच्या कामात फरक येतो ना’, असे विधान केले. त्यामुळे आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
त्यांच्या या विधानावर उत्तर देतांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा निषेध करणारं ट्वीट केलं.
रुपाली चाकणकर यांचे ट्विट
‘आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे. भरत गोगावले ,आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी.आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते .’
आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 12, 2023





