भर पावसात शानने गायलं गाणं; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Singer Shaan | प्रसिद्ध गायक शान मुखर्जीच्या आवाजाची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. आपल्या आवाजाने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच मुंबईमध्ये त्याच्या लाईव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र लाईव्ह शोदरम्यान पावसाने हजेरी लावल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. तरीही शानने गाणे थांबवले नाही. भर पावसातही त्याने आपले गाणे सुरूच ठेवले त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो छत्री घेऊन गाताना दिसत आहे. यावेळी तो संगीतप्रेमींना म्हणतो, “मी तर छत्री घेऊन गात आहे. पावसात भिजू नये यासाठी मी हे सगळं करतोय असं नाही, तर माईक भिजता कामा नये यासाठी छत्री घेऊन उभा आहे. नाहीतर पावसात भिजायला मला खूप आवडतं. ” त्यानंतर त्याने गाणं ‘दिल ने तुमको चुन लिया है’ गाण्यास सुरूवात केली.
View this post on Instagram
सध्या त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘यार, हे क्षण अविस्मरणीय आहेत. हा एक ओपन कॉन्सर्ट होता आणि सगळे उत्साहित असताना पाऊस पडला. गर्दी ओसरली होती, तो भिजला होता, पण तो खऱ्या कलाकारासारखा परफॉर्म करत राहिला.
View this post on Instagram
वातावरण चैतन्यमय ठेवण्यासाठी त्याचा आवाज पुरेसा होता. पावसामुळे सगळे भिजले होते, शान देखील भिजला तरीहीतो गात राहिला हे पाहिल्यावर एक सच्चा कलाकार काय असतो, याची जाणीव झाली, त्याच्या भावनेला सलाम,” असे म्हणत त्याचे कौतुक केले.
हेही वाचा:
’50 खोके एकदम ओके’ घोषणा हा गुन्हा नाही,’ मुंबई हायकोर्टाने फटकारले




