भयंकर…! जावयाने सासूला जिवंत जाळले अन् स्वतःही जळाला; मुंबईतील घटनेने खळबळ

मुंबई : मुलुंड भागातील नाणेपाडा परिसरात एक भयंकर घटना घडली घडली आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटासाठी जबाबदार असल्याचा राग मनात धरून एका जावयाने आपल्या सासूला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. तेव्हा पोलिसांना या हत्याकांडाची कोणतीही माहिती नव्हती. पण नंतर झालेल्या तपासात जावई व सासू यांच्यातील वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाबी दाजी उसरे (72) असे मृत महिलेचे, तर कृष्णा अटनकर (वय-59) असे आरोपी जावयाचे नाव आहे. कृष्णा अटनकरचे बाबी उसरे यांच्या मुलीशी लग्न झाले होते. या दाम्पत्यांत अनेकदा वाद व्हायचा. या कौटुंबिक कलहाला कंटाळून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती.
10 वर्षांपूर्वी या दोघांचा घटस्फोटही झाला होता. या घटस्फोटाला आपली सासू बाबी उसरे कारणीभूत असल्याचा संशय कृष्णाच्या मनात होता. घटस्फोट झाल्यानंतर कृष्णाची पत्नी मुलुंड येथील आपल्या माहेरी आली होती. ती आपल्या 20 वर्षीय मुलासोबत तिथे राहत होती.





