Satara | अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केलेल्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या

लोणंद, (प्रतिनिधी) – पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी राकेश भगवान भंडलकर (वय 25, रा. तांबवे ता. फलटण हल्ली रा. ताथवडा, ता. फलटण) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखीचे दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या १३ वर्षाच्या लहान मुलीला दि. ७ रोजी पहाटे १.३० वा घरी जात असताना लिफट देण्याच्या बहाण्याने मोटार सायकल वरुन युवकाने त्यांना मी त्याच भागात जात आहे तुम्हाला सोडतो असे सांगून त्यातील मुलगी व तिची आई यांना मोटार सायकलवर बसवले.
पाडेगाव टोल नाका येथे गेल्यावर महिलेस खाली उतरवून मुलीस घेऊन पोबारा केला.ही बाब मुलीचे आई-वडीलांचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचे गांभिय लक्षात घेऊन लोणंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा शोध सुरु केला. संशयिताने अल्पवयीन मुलीस पाडेगाव, ता. खंडाळा गावचे हद्दीत रसवंतीजवळ आडमार्गाने येऊन सोडून पसार झाला होता.
पिडीत मुलगी ही अतिशय घाबरलेली होती. पिडीतेने घाबरुन दोन दिवस काही सांगितले नाही. पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी अज्ञात आरोपीचा शोध धेण्यासाठी वेगवेगळी पथक तयार आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. पथकांने सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे खूप प्रयत्न केले. परंतु, पिडीत मुलीला अज्ञात आरोपीने आडमार्गाने नेले असल्यामुळे तिला काहीही माहिती सांगता येत नव्हती.
दि. १४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी पिडीतेचे समुपदेशन करुन, विश्वासात घेवुन विचारपूस केली. वेगवेगळे बारचे फोटो दाखविले असता त्यातील एक हॉटेल ओळखीचे दिसल्याने त्यामधील फु्टेजची पाहणी करुन अज्ञात आरोपीची ओळख पटली.
सपोनि सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सर्जेराव सुळ, संतोष नाळे, विठ्ठल काळे, केतन लाळगे, गोविद आंधळे, सुनिल नामदास, अभिजित घनवट यांनी साफळा रचून पाठलाग करत राकेश भंडलकर यास ताब्यात घेतले. त्याला पोलीस कस्टडी मिळाली आहे.





