मुंबई, दि. 2- करोनामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला होता. त्यानंतर सेमीकंडक्टर आणि इतर सुट्या भागाच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हे प्रश्न संपुष्टात येत असून वाहन कंपन्यांच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे. जुलै महिन्यामध्ये वाहन कंपनीच्या विक्रीत भरमसाठ वाढ झाली असल्याची आकडेवारी या कंपन्यांनी जारी केली आहे. मारुती सुझुकी कंपनीची वाहन विक्री सात टक्क्यांनी वाढवून 1,42,850 इतकी झाली आहे. टाटा मोटर्सची वाहन विक्री 57 टक्क्यानी वाढून 47,50 5 इतकी झाली आहे. महिंद्रा कंपनीची वाहन विक्री 33 टक्क्यांनी वाढून 28,053 इतकी झाली आहे. या कंपनीच्या स्कॉर्पिओ कारला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. किया इंडियाची विक्री 47 टक्क्यानी वाढून 22,022 इतकी झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटारची विक्री 50 टक्क्यांनी वाढून 19,693 इतकी झाली आहे. स्कोडा कंपनीची विक्री 44 टक्क्यांनी वाढून 4,447 इतकी झाली आहे. होंडा कारची विक्री 12 टक्क्यांनी वाढून 6,784 झाली आहे. एमजी मोटारची विक्री पाच टक्क्यांनी कमी होऊन 4,013 इतकी झाली आहे. ह्युंदाई कंपनीची विक्री सहा टक्क्यांनी वाढून 63, 851 इतकी झाली आहे. बहुधांशहकार कंपन्यांच्या विक्रीमध्ये भरपूर वाढ झाली असली तरी बजाज ऑटो या कंपनीच्या दुचाकी वाहन विक्रीत 5% ची घट झाली असून या कंपनीने जुलै महिन्यात 3,15,054 दुचाकीची विक्री केली. कंपनीच्या व्यावसायिक वाहनाची विक्रीत तीन टक्क्यांनी वाढून 39,616 इतकी झाली आहे. टीव्हीएस मोटार कंपनीची विक्री 13 टक्क्यांनी वाढवून 3,14,639 इतकी झाली आहे. महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरची विक्री 14 टक्क्यांनी कमी होऊन 23, 360 इतकी झाली आहे. तर अशोक लेलॅंड या कंपनीच्या व्यावसायिक वाहनाची विक्री 58 टक्क्यांनी वाढून 13,625 इतकी झाली आहे.