पुणे | कौशल्य विकास केंद्राचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
हा कार्यक्रम शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन, बहिरट पाटील चौक, गोखले रस्ता, शिवाजीनगर येथे होणार असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी याबाबत माहिती दिली. किरण साळी, यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी, एनएसडीसीच्या व्यवस्थापक सोनाली गिल, एनएसडीसीचे उपमहाव्यवस्थापक सुमित सिंग या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार,
सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री मंगलप्रभात लोढा,
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत, असे शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी कळविले आहे.
या प्रशिक्षण केंद्रात पहिल्या टप्प्यात एनएसडीसी इंटरनॅशनलमार्फत हेल्थकेअर हॉस्पिटल ब्युटी अँड वेलनेस आणि ग्रीन जॉब स्केल सेक्टर (सोलर एनर्जी) या विभागातील प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली.





