Farmer money order : तुटपुंज्या मदतीवर बळीराजा नाराज.! शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजारांची मनी ऑर्डर
मनी ऑर्डर पाठवण्यासाठी मी माझ्या मित्राकडून १,१०० रुपये उसने घेतले आहेत, असा दावा शेख यांनी केला.

Farmer money order – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या तुटपुंज्या तात्पुरत्या आर्थिक मदतीवर नाराज होऊन धाराशिव जिल्ह्यातील एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५,००० रुपयांचे मनी ऑर्डर पाठवले आहे.
महाराष्ट्रातील ८५ टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५,००० रुपयांची प्राथमिक मदत थेट जमा केली जाईल, अशी घोषणा केली.
प्रशासकीय मूल्यमापन आणि केंद्र सरकारची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याने, ती दिवाळीपूर्वी कायदेशीररीत्या पूर्ण होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
धाराशिव तालुक्यातील सुरदी गावचे शेतकरी चांद शेख यांनी सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५,००० रुपयांचे मनी ऑर्डर पाठवले आहे. मी माझ्या शेतातील दीड एकर जमिनीवर सोयाबीनची लागवड केली होती.
त्यासाठी माझा २५,००० रुपयांचा खर्च झाला, परंतु मला केवळ ६० किलो उत्पन्न मिळाले, ज्यातून मला केवळ ३,९०० रुपये मिळाले. मनी ऑर्डर पाठवण्यासाठी मी माझ्या मित्राकडून १,१०० रुपये उसने घेतले आहेत, असा दावा शेख यांनी केला.





