कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाचे शूटिंग ‘या’ दिवशी पूर्ण होण्याची शक्यता

Bhool Bhulaiyaa 3 | अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘भूल भुलैया’ चित्रपटाच्या मोठ्या यशनंतर आता त्याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कियारा अडवाणी ‘भूल भुलैया 2’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर ‘भूल भुलैया 3′ चित्रपटाचे शुटींग नेमकं कधी पूर्ण होणार, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
मार्चपासून सुरू झालेल्या या चित्रपटाचे शूटिंग येत्या 2 ऑगस्टला पूर्ण होणार आहे. चित्रपटाची टीम गेल्या चार महिन्यांपासून सतत काम करत आहे. दरम्यान, त्याच्या टीझर रिलीजबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. कार्तिक आर्यनसह तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या कलाकारांना यात पाहायला मिळणार आहेत. Bhool Bhulaiyaa 3 |
या बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटात राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कॉमेडीचा तडका लावणार आहेत. ऑगस्टच्या मध्यापर्यंत चित्रपटाचा टीझर रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Bhool Bhulaiyaa 3 |
कार्तिकीने आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली होती. नुकतेच तो ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता ‘भूल भुलैया 3’ चित्रपटासाठी निर्माते खूप उत्सुक आहेत. त्याला पूर्ण आशा आहे की ‘भूल भुलैया 3’लाही पहिलं जिंकण्याचं प्रेम मिळेल. पण यावेळी तो प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळेच प्लॅन करत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा पूर्णपणे नवीन असेल अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत मनोरंजनाचा तडका प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार…! अवघ्या 7 सेकंदात चार मजली इमारत पाण्यात बुडाली; व्हिडिओ व्हायरल





