हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार…! अवघ्या 7 सेकंदात चार मजली इमारत पाण्यात बुडाली; व्हिडिओ व्हायरल

हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार माजवला आहे. ढगफुटीमुळे शहरातीलअंदाजे 30 लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. शिमला (रामपूर झाकरी समेज खड) येथील जल प्रकल्पाजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटी झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत दुजोरा दिला आहे. ढगफुटीची माहिती मिळताच उपायुक्त अनुपम कश्यप आणि पोलीस अधीक्षक संजीव गांधी घटनास्थळी रवाना झाले.
उपायुक्त अनुपम कश्यप म्हणाले…
‘घटनेची माहिती मिळताच डीएसआरएफ, पोलिस दल आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून ३० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळे बचाव पथक उपकरणांसह दोन किलोमीटर चालत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकारी आणि बचाव पथकातील सदस्यांना ढगफुटीमुळे बाधित झालेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगण्यात आले आहे.’
घरे, पूल ढिगाऱ्याखाली वाहून गेले
झाकरी, सिमला रायपूर येथे बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे घानवी आणि समेळ खड्ड्यामध्ये ढगफुटीमुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. घणवी येथे ढगफुटीमुळे आलेल्या पुराची तपासणी केली असता ढगफुटीमुळे ५ घरे, २ फूट पूल, शाळेची इमारत, रुग्णालय, वीज प्रकल्पाचे विश्रामगृह, एक जेसीबी मशीन आणि तीन छोटी वाहने ढिगाऱ्यासह वाहून गेल्याचे आढळून आले. ढगफुटी दरम्यान काही घरांमध्ये मलबा शिरला. याशिवाय झाकरी, सिमला रायपूर येथे 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची भीती आहे. प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिस दल आणि स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहे.
Scary video from #Kullu, Himachal Pradesh shows a building collapsing and being swept away by the raging Parvati River. The incident occurred earlier today amid severe weather conditions. More details awaited. Stay safe and avoid flood-prone areas.#HimachalPradeshRains… pic.twitter.com/FGen35sMkm
— Kumaon Jagran (@KumaonJagran) August 1, 2024
कुल्लूच्या मलाना भागात चार मजली इमारत अवघ्या 7 सेकंदात बुडाली
हा व्हिडिओत कुल्लूच्या मलाना भागातील आहे. येथे रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे पार्वती नदीला महापूर आला, त्यात अनेक घरे व वाहने वाहून गेली. ताज्या व्हिडिओमध्ये चार मजली इमारत अवघ्या 7 सेकंदात पार्वती नदीत बुडाली. पाण्याचा प्रवाहात बिल्डिंग कुठे गेली ते कळले नाही. दररोज अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कुल्लू जिल्ह्यात बियास आणि पार्वती नद्यांना महापूर आला आहे. मलाणा गावात बांधण्यात आलेल्या वीज प्रकल्पाचे धरणही भरले आहे.
कुल्लू येथील वीज प्रकल्पाचे नुकसान
मलाना, कुलू येथे ढगफुटीमुळे वीज प्रकल्पाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या घटनेत अनेक वाहने वाहून गेल्याचेही वृत्त आहे.
VIDEO | Himachal Pradesh: Extensive damage reported in Samej Khed following cloudburst, several people are feared missing. More details are awaited.#HimachalNews #himachalpradeshrains
(Source: Third Party) pic.twitter.com/OQ3UYYdSll
— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2024
जिओरी ते घणवी रस्ता बंद
राष्ट्रीय महामार्ग 5 वरील झाक्री ते किन्नौर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. जेओरी ते घणवी रस्त्यावर वाहतूक बंद आहे. ढाकरी ते समेळ रस्ता समेळ गावाजवळ खराब झाला आहे. समेळ खड्ड्यात पुरामुळे झाकरी ते सरपरा रस्ता बंद झाला आहे. याशिवाय परिसरातील इतर रस्ते वाहतुकीसाठी खुले आहेत.
मंडीत ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील पधार उपविभागातील थलतुखोड येथेही ढगफुटी झाली आहे. दरम्यान, एकाचा मृतदेह सापडला आहे, तर 11 पेक्षा जास्त बेपत्ता आहेत. एनडीआरएफ-एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अनेक घरांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मंडीचे डीसी अपूर्व देवगण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.





