कार्तिक आर्यनच्या ‘या’ चित्रपटाचा 6 वर्षानंतर येणार सिक्वेल

Kartik Aaryan | अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडो रुपयांचा गल्ला जमावला. सध्या एकापाठोपाठ एक पात्र साकारून कार्तिक प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. यातच आता त्याच्या आणखी एका चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. कार्तिक आर्यनच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या प्रसिद्ध चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे.
कार्तिकला ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सिनेमामुळे लोकप्रियता मिळाली होती. या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता या चित्रपटाच्या अधिकृत सिक्वेलवर काम सुरू आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर याचा सिक्वेल येणार आहे. ‘भूल भुलैया 3’ नंतर कार्तिक आर्यन ‘पति पत्नी और वो 2’ आणि ‘आशिकी 3’ वर काम सुरू करणार आहे. याशिवाय यात आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. Kartik Aaryan |
कार्तिक आर्यन त्याच्या 2018 च्या रोमँटिक कॉमेडी ‘सोनू के टीटू की स्वीटी’ च्या सिक्वेलची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिक आर्यन आणि लव रंजन यांनी ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या हिट चित्रपटाच्या सिक्वेलसाठी बोलणी सुरू केली आहे. 2025 च्या उत्तरार्धात चित्रीकरण सुरू करण्याची त्यांची योजना आहे. लव रंजन सध्या या रोमँटिक कॉमेडीच्या दुसऱ्या भागाची पटकथा लिहित आहेत. या चित्रपटाची कथा पहिल्या चित्रपटाची कथा पुढे चालू ठेवेल की पूर्णपणे नवीन कथा असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Kartik Aaryan |
दरम्यान, ‘सोनू के टीटू की स्वीटी 2’पूर्वी कार्तिक आर्यन आणि लव रंजन यांनी ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘आकाशवाणी’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तो ‘पति, पत्नी और वो 2’ आणि अनुराग बसू दिग्दर्शित ‘आशिकी 3’ चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर ‘सोनू के टीटू की स्वीटी 2’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असल्याची चर्चा आहे. Kartik Aaryan |
हेही वाचा:





