शिष्यवृत्ती परीक्षा आता 12 ऑगस्टला
Updated On:

पुणे -राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
आता ती 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होते. करोनामुळे ती 25 एप्रिल रोजी घेण्याचे नियोजन होते. त्यानंतर 23 मे रोजीची तारीख जाहीर करण्यात आली होती.





