Satara | वडूजच्या माळी कुटुंबीयांनी साकारला अष्टलक्ष्मीचा देखावा

वडूज, (प्रतिनिधी) – सध्या गणेश उसवाची धामधूम सुरू असून सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या बरोबर घरगुती गणपतीचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. येथील माळी कुटुंबीयांनी अष्टलक्ष्मीचा देखावा साकारलाअसून तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
येथील सुप्रसिद्ध बांधकाम उद्योजक व अभियंता अविनाश माळी यांचे कुटुबिय नेहमीच धार्मिक कार्यात अग्रेसर असते . यावर्षी त्यांच्या कुटुबियाने घरगुती गणपती समोर अष्टलक्ष्मीचा देखावा साकार केला आहे.
यामध्ये आदिलक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी, विद्या लक्ष्मी,धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजय लक्ष्मी, धनलक्ष्मी अशी लक्ष्मीची आठ रूपे साकार केली असून या विविध रुपाची महती या देखाव्यातून विषद केली आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी भेट दिली.
या कुटुंबीयांतील शीतल अविनाश माळी, ऋषाली अमर माळी, अनुप्रीता अभिजित माळी यांनी हा देखावा साकार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.





