Mohit Suri : ‘सैयारा’च्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक मोहित सूरींचा (Mohit Suri) पुढचा चित्रपट कोणता असणार याविषयी मोठी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. अखेर या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्याच आठवड्यात मोहित सुरींनी अहान पांडे आणि अनित पड्डा यांना पुन्हा एकत्र घेऊन नवीन चित्रपट करणार असल्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यांचा नवीन चित्रपटही रोमँटिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता या चित्रपटाचे नाव काय ठेवण्यात आले आहे. याविषयी माहिती समोर आली आहे. व्हरायटी इंडियाच्या एका वृत्तानुसार, चित्रपटाचे ‘सतरंग’ ठेवण्यात आले आहे. मात्र, हे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. या नावात बदल होऊ शकतो. (Mohit Suri ) Mohit Suri : ‘सैयारा’फेम जोडी पुन्हा एकत्र दिसणार! दिग्दर्शकाने केली आगामी चित्रपटाची घोषणा ‘सैयारा’प्रमाणेच हाही चित्रपट एक प्रेमकहाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सैयारा’मधील अहान आणि अनीतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटानंतर दोघेही रातोरात स्टार झाले. त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. आगामी नवीन चित्रपटात अहान आणि अनीत पुन्हा एकदा मोठ्या स्क्रिनवर एकत्र दिसणार असल्याने चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात प्रेमाचा एक अधिक सखोल आणि वेगळा पैलू दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शक मोहित सुरी सध्या पटकथेला अंतिम स्वरूप देत आहेत. या वर्षाच्या अखेरीस चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता असून, चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. आगामी चित्रपटाबद्दल मोहित सूरी काय म्हणाले? (Mohit Suri ) मोहित सूरी यांनी या आगामी प्रोजेक्टबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले, “प्रेमकथा माझ्यासाठी नेहमीच अत्यंत महत्त्वाच्या राहिल्या आहेत. जेव्हा भावना तीव्र आणि अनियंत्रित होतात, तेव्हाच प्रेमाची खरी जाणीव होते.” ‘सैयारा’बद्दल मोहित म्हणाले, “हा चित्रपट हेच इतक्या स्पष्टपणे दाखवतो. ‘सैयारा’च्या टीमसोबत पुन्हा एकत्र येणे माझ्यासाठी खूप खास आहे. जणू काही हे नशिबातच लिहिले होते.” हेही वाचा : TOP 10 News : सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर ते तिलकचे शतक अन् गुजरातचं ‘पॅक-अप’; जाणून घ्या आजच्या TOP 10 News