निकाल महापालिकेचा, पण चर्चा ‘रसमलाई’ची.! सोशल मीडियावर आला मीम्सचा महापूर, ठाकरेंना डिवचलं

BMC Results 2026 : मुंबई महापालिकेत भाजपने मुसंडी मारल्यानंतर राजकीय गणिते तर बदललीच आहेत, पण सोशल मीडियावर एक वेगळंच ‘युद्ध’ पाहायला मिळत आहे. हे युद्ध आहे ‘रसमलाई’चे! निकाल हाती येताच नेटिझन्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून रसमलाईचे फोटो आणि मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. यामागे नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊया.
काय आहे ‘रसमलाई’ कनेक्शन?
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई हे मुंबईत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी “मुंबई हे केवळ महाराष्ट्राचे शहर नसून ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असे विधान केले होते.
या विधानावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत संताप व्यक्त केला होता. अन्नामलाई यांच्या नावाचा उच्चार करत त्यांनी उपहासाने म्हटले होते, “कुठली तरी ‘रसमलाई’ तामिळनाडूवरून आली आहे आणि आम्हाला मुंबईबद्दल शिकवतेय!” इतकेच नव्हे तर त्यांनी जुना ‘हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ हा नाराही पुन्हा दिला होता.
मात्र, आज जेव्हा निकालांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने मुंबईत स्पष्ट बहुमत मिळवले, तेव्हा भाजपने याच ‘रसमलाई’ शब्दाचा वापर करून राज ठाकरेंना टार्गेट केले आहे.
Welcome to Raj Thackeray’s new rasmalai shop!#BMCResults pic.twitter.com/21i5TaF7kB
— Being Political (@BeingPolitical1) January 16, 2026
सोशल मीडियावर भाजप समर्थक लिहीत आहेत की, ज्यांना तुम्ही ‘रसमलाई’ म्हणून हिणवले, त्यांनीच मुंबईत भाजपला मोठे यश मिळवून दिले. भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि पी.सी. मोहन यांनी सोशल मीडियावर रसमलाईचे फोटो शेअर करून “#RasmalaiVictory” असे हॅशटॅग चालवले आहेत. “भाजपच्या या विजयाची चव रसमलाईसारखी गोड आहे,” अशा आशयाच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.
Hello @RajThackeray, Kaisi lagi Rasmalai ? 😂#DevaBhauWins pic.twitter.com/8nnHULERkv
— Mudit Jain (@MuditJain_IN) January 16, 2026
राज ठाकरे रसमलाईत डुबकी मारत असतील, असं लिहीत दुसऱ्या युजरने एक चिमटाच काढला. राज ठाकरेंच्या नवीन रसमलई दुकानात आपले स्वागत आहे असं बीईंग पॉलिटिकल नावाच्या एका युजरने लिहीलं. सध्या हे मिम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.





