संजय राऊत यांची जबाबदारी ‘या’ तीन नेत्यांवर
Updated On:

मुंबई: शिवसेना खासदार ‘संजय राऊत’ यांना आज लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने राऊत आज रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ.जयललिता पारकर हे संजय राऊत यांच्यावर उपचार करणार असून, पुढचे दोन दिवस राऊत रुग्णालयात असणार आहे.
दरम्यान, राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची जबाबदारी तीन नेत्यांवर सोपवली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं, म्हणून राऊत यांनी भाजपाला गेल्या पंधरा दिवसात सडो की पळो करून सोडले होते. त्यानंतर आता भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्याने आमदारांची जुळवा जुळव करत असताताना राऊत रुग्णालयात दाखल झाले आहेत.





