विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची रिलीज डेट समोर

Vicky Kaushal | अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. यात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या लुकने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. यातच आता सोशल मीडियावर ‘छावा’ चित्रपटाचा टीझर लीक झाला आहे, ज्यावर प्रेक्षकांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘छावा’ सिनेमाचा टीझर लीक झाल्यानंतर त्यामध्ये या चित्रपटाची रिलीज डेटही बघायला मिळत आहे. या व्हायरल झालेल्या टीझरमध्ये 6 डिसेंबरला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दिवशी विकी कौशलच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर एक ऐतिहासिक कथा पाहता येणार आहे. Vicky Kaushal |
#Chhava teaser 💥🔥#VickyKaushal in a never-seen-before avatar 🔥 🥵 #ChhavaTeaser #Chhava#LaxmanUtekar #Chava #MaddockFilms #Stree2 #ShraddhaKapoor #AkshayKumar pic.twitter.com/dvpt6B4Cy3
— Siddharth (@sid23cool) August 14, 2024
मॅडॉक फिल्म्स आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर ‘छावा’ चित्रपटाच्या टीझरने अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये, संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल शेकडो योद्ध्यांना एकट्याने पराभूत करताना दिसत आहे. तर यात रश्मिका मंदान्ना संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता संतोष जुवेकर देखील या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहे.Vicky Kaushal |
याआधी, विकी ‘सॅम बहादूर’ या बायोपिक चित्रपटात भारतातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसला आहे. यानंतर आता ‘छावा’ चित्रपटात तो एका महत्त्वाच्या ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रश्मिका, विकीसह अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा:
‘माझी लाडकी बहिण योजने’वर अमृता फडणवीस म्हणाल्या,’…अशीच सरकारची इच्छा’





