मुंबई : सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असलेला तसेच बिग बॉस मराठी सिझन ५ चा विजेता सुरज चव्हाण हा मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी सिनेमा ‘झापुक झुपूक’मुळे जास्त चर्चेत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केल्यापासून सूरजच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. कधी रिलीज होणार ‘झापुक झुपूक’ सिनेमा? केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ सिनेमा बनवणार असल्याची घोषणा कधीच केली होती. तेव्हापासून सूरजच्या चाहत्यांच्या नजरा या सिनेमाकडे लागल्या होत्या. अखेर या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 25 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याची झलक सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. View this post on Instagram A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi) सूरज चव्हाण रीलमुळे तर फेमस होताच मात्र बिग बॉस मराठी 5 ने सूरजला एक नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तो आता अभिनयाकडेही वळाला असून त्याला चांगल्या चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. त्याचा फेमस डायलॉग आणि हटके पॅटर्न ‘झापुक झुपूक’ करत त्याने बिग बॉस गाजवलं होतं.याच मंचावर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली होती. आता त्याच्या याच हटके पॅटर्नवर सिनेमा येतोय. सूरज चव्हाणचा पहिला चित्रपट ‘राजाराणी’ 18 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सूरजशिवाय रोहन पाटील आणि तानाजी गळगुंडे महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता हा ‘झापुक झुपूक’ त्याचा दुसरा सिनेमा असणार आहे. त्यामुळे आता या सिनेमाला किती प्रेम मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.