अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ चित्रपटाची रिलीट डेट जाहीर

Bhooth Bangla Release Date Out | अभिनेता अक्षय कुमार विविध भूमिकांद्वारे आपल्या खास अभिनय शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. मात्र त्याचे सलग काही चित्रपट बॉक्स ऑफिवर अपयशी ठरले. यानंतर त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर या चित्रपटाचे पोस्टर शेअर प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूत बंगला’बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता हा चित्रपट 2 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये तो रात्रीच्या अंधारात कंदील घेऊन झपाटलेल्या बंगल्यावर बसलेला दिसत आहे.
View this post on Instagram
यासोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज आम्ही आमच्या हॉरर कॉमेडी भूत बंगला चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहोत, त्यामुळे मी माझ्या आवडत्या प्रियदर्शनसोबत सेटवर येण्यासाठी खूप उत्सुक आहे. भीती आणि हास्याचा हा दुहेरी डोस तुमच्यासाठी 2 एप्रिल 2026 रोजी तयार असेल, तोपर्यंत आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो.”
हॉरर-कॉमेडी किंग दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार ही जोडी ‘भूत बंगला’निमित्त १४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे. या जोडीने यापूर्वी अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत आणि आता ते पुन्हा कोणते आश्चर्यकारक काम करतील याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रियदर्शनच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या भूत बंगलाची निर्मिती शोभा कपूर, एकता आर कपूर आणि अक्षय कुमार यांच्या केप ऑफ गुड फिल्म्सच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
हेही वाचा:





