जगातील आणि महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून मजबूत व्हावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

मुंबई : “विश्वातील विविध विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून अधिक मजबूत होण्याची शक्यता विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे”, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्व मराठी संमेलन 2023 या कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘मराठी भाषा : काल, आज आणि उद्या’ या विषयी चर्चा सत्राच्या अध्यक्ष म्हणून उपसभापती गोऱ्हे बोलत होत्या.
विश्वातील विविध विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून अधिक मजबूत होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती @neelamgorhe यांनी #मराठीतितुकामेळवावा या #विश्वमराठीसंमेलन मधील चर्चासत्रात केले. pic.twitter.com/jXPWHWmw9u
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 4, 2023
उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, “जगातील ज्या विद्यापीठांमध्ये याआधीच समन्वय झालेला आहे, तिथे तो समन्वय अधिक मजबूत व्हावा तसेच त्या विद्यापीठांमध्ये आणि आपल्याकडील विद्यापीठात मराठी भाषेच्या बरोबरच इतिहास, विज्ञान, गणित, शेती या विषयी शिक्षणाच्या पद्धती अशा अनेक विषयांच्या अनुभवाची देवाणघेवाण आणि विचार मंथन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे”.
#सोप्या मराठी भाषेचा सहज वापर व वावर सर्वत्र व्हावा:डॉ.नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र शासनाच्या मराठी तितुका मेळवावा विश्व मराठी साहित्य संमेलनात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन;विद्यापीठे, उद्योग व्यवसाय व पर्यटन विकासात मराठीचा वापर अनिवार्य @MahaDGIPR pic.twitter.com/sMEcHW9H5e— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) January 4, 2023
ज्याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार कपडे खरेदी करतो, विविध उपहारगृहांत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखतो, त्याप्रमाणे आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होण्यासाठी नवनवीन लेखकांची पुस्तके खरेदी करुन वाचावीत. पालकांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
जगातील अनेक देशांमध्ये मराठी जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविणारी मंडळे आहेत. मराठी वृद्धिंगत होण्यासाठी अमेरिका, रशिया, जर्मनी अशा विविध देशात काम सुरू आहे. आपल्या राज्यातही शासनाच्यावतीने उपक्रम राबविले जातात, असे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले.





