पुणे जिल्हा | चिंबळीतील देवस्थांनाची नोंद धर्मदाय आयुक्तांकडे होणार

चिंबळी, (वार्ताहर)- ग्रामपंचायत चिंबळी येथे सरपंच ज्योती जैद यांच्या अध्यक्षतेखालील महादेव मंदिराच्या सभामंडपात आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा नुकतीच झाली. चिंबळी ग्रामपंचायतींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत श्री काळभैरवनाथ महाराज व इतर देवस्थान चिंबळी या नावाने नोंद धर्मदाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे करण्यासाठी चर्चा करण्यात आली. तर न्यासाचा सभासदाचा प्रकार व अधिकार वर्गणी फी व प्रथम विश्वस्त मंडळाची मुदत ठरविणे नोंदणीचा अधिकारबाबत चर्चा करणे आदि विषयांवर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजित करण्यात आले होते.
सरपंच ज्योती जैद, उपसरपंच राहुल चव्हाण, बाजार समितीचे संचालक व सदस्य अनुराग जैद, काळूराम बनकर, शिवाजी कड, चेतन बर्गे, गणेश सोनवणे, सदस्या संगीता बनकर, ज्योती जाधव, शितल लोखंडे, शर्मिला कड, शोभा कड, पोलीस पाटील मयुरी बनकर/राऊत, बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, संचालक पांडुरंग बनकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष हिरामण जैद, शंकर पांडूरंग जैद, खजिनदार विश्वास बर्गे, सचिव बाळासाहेब जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अभिजीत जगनाडे, माजी उपसरपंच हेमंत जैद, अर्जुन अवघडे, आप्पासाहेब लोखंडे, माऊली कड, पोपट बहिरट, ग्रामविकास अधिकारी तुषार साळुंखे, बाळासाहेब तुकाराम जाधव, दीपक पाटोळे, लंकेश पाटारे, दिलीप सातव, अमोल बहिरट, तानाजी जैद, संभाजी अवघडे, दादासाहेब जैद, सुमित जाधव आदि मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ तसेच नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. याप्रसंगी आळदी पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




