Raid 2 | अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा ‘रेड 2’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आयकर अधिकारी अमर पटनायकच्या भूमिकेतून अजय पुन्हा पडद्यावर आला. तर रितेश या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात इलियाना डिक्रूज अजयच्या पत्नीच्या भूमिकेत होती. मात्र दुसऱ्या भागात वाणी कपूरने अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. आता इलियानाला बदलण्याबाबत चित्रपटाच्या दिग्दर्शकाने भाष्य केले आहे. रेड 2 मध्ये इलियाना डिक्रूजला वाणी कपूरने बदलण्याबाबत दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, ‘पहिल्या चित्रपटात इलियाना होती, यात वाणी आहे आणि याबाबत कोणतीही नकारात्मकता नाही. अनेक चित्रपटांमध्ये अशी परिस्थिती येते. यापूर्वीही बदल झाले आहेत, यातही झाले आहेत. काही परिस्थितीमुळे एका पात्राला वेगवेगळे कलाकार साकारतात. इलियाना ही रेडच्या विश्वाचा एक भाग आहे आणि हे नाकारता येणार नाही.’ पुढे राज कुमार गुप्ता यांनी इलियाना डिक्रूजबाबत सांगितले की, तिचे लग्न झाले आहे, ‘तिला कुटुंब आहे आणि एक मूलही आहे. इलियानाच्या काही प्राधान्यक्रम होत्या आणि ती आता भारताबाहेर गेली आहे. आम्ही एकत्र चांगले काम केले आहे.’ १ मे रोजी रिलीज झालेल्या ‘रेड २’ चित्रपटाने १४ दिवसात जगभरात १७९.८ कोटींची कमाई केली आहे. तर देशात सिनेमाने आतापर्यंत १३३.४५ कोटी कमावले आहेत. हेही वाचा: धीरज घाटे पुन्हा शहराध्यक्ष, प्रदिप कंद यांना उत्तर पुणे; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जिल्हाध्यक्षांचा निर्णय ‘पेडिंग’! कारण…