Video: विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी प्राचार्यांनी केला भन्नाट डान्स…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयामध्ये तालुकास्तरीय क्रीडा सामने आयोजित केले होते .पावसामुळे क्रीडा स्पर्धेच्या कबड्डीचे सामने रद्द करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले होते.
विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी प्राचार्यांनी केला भन्नाट डान्स…
शिरूर तालुक्यातील टाकळी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयामध्ये तालुकास्तरीय क्रीडा सामने आयोजित केले होते. पावसामुळे सामने रद्द झालेे होते त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. pic.twitter.com/U5P0FSdkIZ
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 24, 2024
तेथील प्राचार्य आर.बी .गावडे सर यांनी नाराज झालेल्या विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी प्राचार्य गावडे सरांनी विद्यार्थ्यांसोबत संबळ हलगीच्या तालावर विद्यार्थ्यांसोबत डान्स केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद उमटला होता. त्यामुळे विद्यार्थी खेळाडूंचा आनंद द्विगुणीत झाला.





