Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा दमदार टीझर समोर
Riteish Deshmukh : ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे.

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा दमदार टीझर समोर आला आहे. चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगितली जाणार आहे. विशेष म्हणजे यात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘राजा शिवाजी’चा टीझर पहिल्यांदा ‘धुरंधर २’च्या स्क्रीनिंगदरम्यान थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यानंतर आता हा टीजर मोबाइलवरही पाहता येणार आहे.
‘राजा शिवाजी’च्या टीझरवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. रितेश देशमुखला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून चाहते भारावून गेले आहेत.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या उदयाला समर्पित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात रितेशसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन ईरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेले दर्जेदार संगीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी आहे. Riteish Deshmukh
जेनेलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.
हेही वाचा:






