Amitabh Bachchan : शस्त्रक्रियेबाबतची पोस्ट माझ्याबद्दल नव्हती.! अमिताभ बच्चन यांचे तब्येतीविषयी स्पष्टीकरण
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर पूर्णविराम दिला आहे.

Amitabh Bachchan – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर पूर्णविराम दिला आहे. नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी रुग्णालयातील उपचार, शस्त्रक्रिया आणि आयसीयूबाबत केलेला उल्लेख हा स्वतःच्या आरोग्याबद्दल नसून, लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या या गूढ पोस्टमुळे मंगळवारी त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा नवीन पोस्ट शेअर करत त्यांनी यामागचे खरे कारण सांगितले.
अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले की, ही पोस्ट फीफा वर्ल्ड कप फायनलमधील स्पेनकडून अर्जेंटिनाला मिळालेल्या पराभवावर आधारित होती. मी पूर्णपणे ठीक आहे, माझ्या पोस्टचा गैरसमज झाला. मी फक्त एक उदाहरण देत होतो, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, एखादा मोठा पराभव पचवताना खेळाडूला होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास दाखवण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रियेनंतरच्या रिकव्हरीचा रूपक म्हणून वापर केला होता.
अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याच्या पराभवाचा संदर्भ देत त्यांनी लिहिले होते की शस्त्रक्रिया किंवा आयसीयूच्या घटनेनंतरचा सर्वात कठीण काळ हा जेव्हा तुम्ही घरी परतता आणि स्वतःच्या नाजूक/जखमी परिस्थितीचा सामना करता, तो असतो.
त्याचप्रमाणे, जेव्हा एखादा चॅम्पियन हरतो, तेव्हा पराभवानंतर स्वतःचा सामना करणे हा त्याच्यासाठी सर्वात कठीण काळ असतो. माझा संदर्भ अर्जेंटिनाचा पराभव आणि चॅम्पियन मेस्सीच्या पराभवाशी होता. लोकांनी याचा संबंध माझ्याशी जोडला.. जो पूर्णपणे चुकीचा आहे असे त्यांनी नमूद केले.






