Naseeruddin Shah : “एक दिवस याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील”; विद्यार्थींवर लाठीचार्ज केल्याने नसीरुद्दीन शाह संतापले
Naseeruddin Shah : 'तुम्ही हिंमत सोडू नका, लढा सुरू ठेवा'; नसीरुद्दीन शाह यांचे विद्यार्थांना आवाहन

Naseeruddin Shah : नीट परिक्षेतील पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. 20 जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ रॅलीदरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला आणि त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. (Naseeruddin Shah)
यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. विशेष म्हणजे अभिनेते नसीरुद्दीन शाह देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनात त्यांच्या दोन मुलांसह सहभागी झाले होते. परंतु विद्यार्थींवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेवर नसीरुद्दीन शाह यांनी संताप व्यक्त केला आहे. (Naseeruddin Shah)
नसीरुद्दीन शाह यांनी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसेचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणतात की, “नमस्कार, मी नसीरुद्दीन शाह…पहिली गोष्ट म्हणजे जर एखादा अज्ञानी माणूस या देशाचं नेतृत्व करत असेल, तर त्याची इच्छा हीच असेल की संपूर्ण देशही त्याच्यासारखाच अज्ञानी, अकार्यक्षम आणि निर्दयी व्हावा. राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि पुणे फिल्म इंस्टिट्युटमधून अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर मी सगळ्यात जास्त अभिनयाचे धडे जर कुणाकडून घेतले असतील तर ते विद्यार्थ्यांकडून ज्यांनी मी शिकवलं. मी त्यांना सलाम करतो”. (Naseeruddin Shah)
बच्चों से मुझे कहना है कि मैं तुम्हें हज़ार-हज़ार सलाम करता हूँ हिम्मत ना हारें।
और मैं इस मुल्क की हुक़ूमत से बस इतना कहना चाहता हूँ कि सब याद रखा जाएगा – नसीरुद्दीन शाह
pic.twitter.com/EmtfCRaRjr— Saurabh (@sauravyadav1133) July 22, 2026
“माझं हृदय भरून आलं आणि आपल्या मुलांवर ज्याप्रकारे अत्याचार केले जात आहेत ते पाहून मला खूप राग येतो आहे. चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या घेतलेले गुंड मला अमेरिकेच्या आईसीई एजंटची आठवण करून देतात. कधीतरी या मुलांबाबतही विचार करा आणि हे लक्षात ठेवा की एक दिवस याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील.
या सगळ्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही हिंमत सोडू नका. अनेक लोक तुमच्यासोबत आहेत. तुम्ही लढा सुरू ठेवा. आपल्या देशाच्या युवा पिढीकडून माझ्या अपेक्षा आता आणखी वाढल्या आहेत. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत”, असंही पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले. (Naseeruddin Shah)
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. नसीरुद्दीन शाह यांच्यासह शबाना आझमी, कुनिका सदानंद आणि प्रकाश राज या कलाकारांनी जंतर-मंतरला भेट दिली, तसेच अनेक इतर कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियाद्वारे आपली भूमिका मांडली. (Naseeruddin Shah)
हेही वाचा:





