‘दिल्ली क्राइम’च्या तिसऱ्या सीझनमध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एन्ट्री

Delhi Crime Season 3 | शेफली शाह स्टारर नेटफ्लिक्स वेब सीरिज ‘दिल्ली क्राइम’ प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. 2012 मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. या सत्य घटनेवर आधारित या असलेल्या पहिल्या सीझनला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारही मिळाला. त्याच्या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. यातच आता याबाबत एक अपडेट समोर आली आहे.
या लोकप्रिय वेब सिरीजचा तिसरा सीझन सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री हुमा कुरेशी दिल्ली क्राइम ३ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. या शोमध्ये ती शेफालीसोबत नकारात्मक भूमिका साकारताना दिसेल. याबाबत हुमा कुरेशी म्हणाली, ‘जेव्हा निर्मात्यांनी तिसऱ्या सीझनसाठी मला संपर्क साधला तेव्हा माझ्या आनंद झाला. मला नकारात्मक भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला. मला आशा आहे की मी माझ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन.’ Delhi Crime Season 3 |
दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनचे दिग्दर्शन तनुज चोप्रा यांनी केले होते. या शोचा पहिला सीझन दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या बलात्काराच्या घटनेवर आधारित होता. पहिला सीझन २०१९ मध्ये आला, ज्याचे दिग्दर्शन रिची मेहता यांनी केले होते. दुसरा सीझन एका सायको-मर्डर मिस्ट्रीवर आधारित होता. Delhi Crime Season 3 |
हेही वाचा:
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनीचा मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह





