रायगडमधील राजकीय वातावरण तापलं! शिंदेसेनेच्या आमदाराचे तटकरेंना खुलं आव्हान, काय म्हणाले पाहा….

MLA Mahendra Thorve : रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणावाचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आमदाराने शिवसैनिकांच्या पायावर डोके ठेवेन पण राष्ट्रवादीपुढे कधीच झुकणार नाही, असे विधान केले आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे पुन्हा एकदा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात अंतर्गत संघर्ष सुरुच असल्याचे दिसत आहे.
कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मतदारसंघात खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या विधानाने रायगडचे राजकारण ढवळून निघाले आहे. या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समाचार घेत काठावर वाचलेले आमदार अशी घणाघाती टीका त्यांच्यावर केली आहे. यामुळे महायुतीत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
काय म्हणाले थोरवे?
शिवसैनिकांच्या पायावर डोके ठेवेन, पण राष्ट्रवादीपुढे कधीच झुकणार नाही. शिंदेंचे शिवसेनेत मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठीमागून पाठीत त्यांच्या खंजीर खुपसले तर आम्ही राजीनामा नाही तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या मग मी माझा राजीनामा देतो, असे आमदार थोरवे म्हणाले. सुनील तटकरे यांनी राजीनामा दिला तर माझे सुद्धा राजीनामा द्यायची तयारी आहे, असे विधान कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले असून त्यांनी सुनील तटकरे यांना खुलं आव्हान दिले आहे.





